शहीद शुभम सावंत यांना मानवंदना

शहीद शुभम सावंत यांना मानवंदना
Published on

57489

शहीद सावंत यांच्या स्मृतींचे जतन

माजगावात पुतळा; स्वातंत्र्यदिनी अनावरण

सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. १६ : माजगावचे वीर सुपुत्र आणि भारतीय नौदलातील शहीद नौसैनिक शुभम अक्षता उदय सावंत यांच्या पुतळ्याचे १५ ऑगस्ट रोजी माजगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अनावरण करण्यात आले. ​ऑक्टोबर-२०१४ मध्ये आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आलेल्या ‘हुदहुद’ चक्रीवादळादरम्यान राबवलेल्या ‘ऑपरेशन रिलीफ’मध्ये मदतकार्य करताना अवघ्या २० व्या वर्षी सावंत यांना वीरमरण आले होते. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाचा आणि स्मृतींचा वारसा जपण्यासाठी माजगाव ग्रामपंचायतीने हा पुतळा उभारला आहे.
सकाळी प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल (डॉ.) रत्नेश सिन्हा (निवृत्त) यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. या प्रसंगी माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. वीरपिता उदय सावंत, वीरमाता अक्षता सावंत, तसेच माजगाव खोतवाडा येथील वीरपत्नी तिलोत्तमा दीपक सावंत यांचा शाल, श्रीफळ आणि नारळाचे रोप देऊन ​विशेष गौरव करण्यात आला. शहीद शुभम सावंत यांचा देखणा पुतळा साकारणारे माजगाव खोतवाडा येथील मूर्तिकार काका सावंत यांचाही विशेष सत्कार केला. सरपंच रंजना कानसे, उपसरपंच रिचर्ड डिमेलो आणि सदस्यांनी निवृत्त सुभेदार मेजर संजय सावंत व उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार केला.
​आपल्या भाषणात डॉ. रत्नेश सिन्हा यांनी सैनिक जीवनातील विविध अनुभव मांडले, तर निवृत्त सुभेदार मेजर संजय सावंत यांनी तरुण पिढीने आयुष्यात विशिष्ट ध्येय ठेवून जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. माजगावातील तरुणांनी मोठ्या संख्येने सैन्यदलात भरती व्हावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, निवृत्त पोलिस प्रभाकर सावंत, माजी सभापती अशोक दळवी सी. ए. लक्ष्मण नाईक उपस्थित होते. सरपंच रंजना कानसे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com