तेरवणमध्ये धोकादायक डी.पी. अखेर बदलला

तेरवणमध्ये धोकादायक 
डी.पी. अखेर बदलला
Published on

(फोटो एक कॉलम ववापरावेत)

57544
तेरवण ः येथे नव्याने बसविलेला डी.पी.

तेरवणमध्ये धोकादायक
डी.पी. अखेर बदलला
दोडामार्ग : तेरवण गावातील खराब झालेला वीज वितरणाचा डी.पी. आणि जीर्ण वाहिन्या यामुळे पाळीव प्राणी तसेच ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या समस्येबाबत शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, गुरुवारी (ता. १३) महावितरणकडून नवीन डी.पी. बसवून जीर्ण वाहिन्या बदलल्या. शिवसेनेचे पदाधिकारी विजय गवस, सदाशिव गवस, उमेश गवस, अजय गवस, गोपाळ गवस, तुकाराम नारायण गवस, सचिन गवस, मोहन गवस, सुहास गवस, मंगल गवस, ऋतुजा सावंत आदींनी पाठपुरावा केला. या समस्येची माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना तालुका प्रमुख व पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी तत्काळ दखल घेत महावितरणला आवश्यक दुरुस्तीचे निर्देश दिले.
---
57617

तळेरे बाजारपेठेत
नागमूर्ती दाखल
तळेरे : श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा हिंदू सण असलेल्या नागपंचमीला आता अवघे एकच दिवस शिल्लक राहिल्याने तळेरे बाजारपेठेत सणाच्या तयारीला वेग आला आहे. नागपंचमीच्या पूजनासाठी आवश्यक असलेल्या नागदेवतेच्या मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाल्या असून, मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. नागपंचमीच्या दिवशी घराघरांत नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. नागांना देवस्वरूप मानून त्यांच्या पूजनाची परंपरा असून, या दिवशी घरातील वातावरण भक्तिमय आणि उत्साही होते. मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी नागपंचमीच्या सणासाठी गावाकडे परतू लागले आहेत. बाजारपेठेत सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूजनासोबतच सर्प व निसर्गातील इतर जीवांबद्दल संवेदनशीलता आणि त्यांच्या संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची गरजही या सणातून अधोरेखित होते.
---
57484

गौरी बांदेकर, सावंतांना
‘कोकण कला रील स्टार’
बांदा ः अस्सल मालवणी भाषेतील विनोदी रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या गौरी बांदेकर आणि राज सावंत या आत्या-भाच्याच्या जोडीला ‘कोकण कला रील्स स्टार २०२६’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. ओरोस येथील पत्रकार भवनात आयोजित विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला. उत्कृष्ट संवादफेक, दर्जेदार अभिनय आणि कल्पक विनोदी सादरीकरणाच्या जोरावर या जोडीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. ‘ए बाबू’ या नावाने कोकणच्या हास्यविश्वात वेगळा ठसा उमटवणाऱ्या या जोडीच्या शिरपेचात या पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com