

- rat१६p३७.jpg-
26O57614
लांजा ः तालुका मराठा संघाच्यावतीने निवेदन देताना लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, सरचिटणीस विजय पाटोळे, उपाध्यक्ष शरद चव्हाण, समीर सावंत पदाधिकारी
-----
अण्णासाहेब महामंडळ सक्षम करा
मराठा संघाचे साकडे ; लांजा तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १७ ः मराठा समाजातील युवक-युवतींना रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनस्तरावर येणाऱ्या अडचणी दूर करून अधिक सक्षम बनवावे, अशी मागणी लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली.
लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना हे निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजातील विविध शासकीय सवलतींचा लाभ मराठा समाजाला मिळावा, यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र मराठा समाजातील अल्पशिक्षित व व्यवसाभिमुख असा मोठा वर्ग हा स्वयंरोजगारावर अवलंबून आहे. या मराठा समाजातील युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे खुप फायदेशीर ठरत आहे. या महामंडळाने आतापर्यंत एक लाखांहून अधिक मराठा उद्योजक घडविले आहेत. या महामंडळाला ३०० कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र अलीकडे महामंडळाच्या कामकाजात अनेक आर्थिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने मराठा समाजातील युवक-युवतींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शासनाने मराठा समाजासाठी असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर भेडसावणाऱ्या अडचणी दूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देताना लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, सरचिटणीस विजय पाटोळे, उपाध्यक्ष शरद चव्हाण, समीर सावंत पदाधिकारी राजू जाधव, स्वप्ना सावंत यांच्यासह गुरुप्रसाद देसाई, अनंत उर्फ बापू जाधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.