आवडत्या क्षेत्रात यश मिळवण्याचा संकल्प करा

आवडत्या क्षेत्रात यश मिळवण्याचा संकल्प करा
Published on

ध्येय ठरवा अन् यश मिळवा!
बळीराम राठोड ः साखळोलीत विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १७ ः ‘ध्येयवेडी माणसं इतिहास रचतात. त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडत्या क्षेत्रात नाव कोरण्याचा संकल्प करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत,’ असे प्रतिपादन गावतळे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ येथे शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना राठोड यांनी वरील विचार व्यक्त केले. शाळेतील आद्या विनोद गोरीवले हिने शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक, तसेच दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. तिच्यासह माही सचिन गौरत, मैत्री मनोहर आडविलकर आणि सिद्धांत शुद्धोधन तांबे हे विद्यार्थीही शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले. इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत सिया महेश देवघरकर ही पात्र ठरली असून, तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक संजय मेहता यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. आद्या विनोद गोरीवले, माही सचिन गौरत, मैत्री मनोहर आडविलकर, सिद्धांत शुद्धोधन तांबे, सिया महेश देवघरकर या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक समीर ठसाळ, संजय मेहता यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com