कणकवलीत गुणवंतांचा सत्‍कार

कणकवलीत गुणवंतांचा सत्‍कार
Published on

57723

कणकवलीत गुणवंतांचा सत्‍कार
कणकवली : मुंबई विद्यापिठाचा ५९ वा युवा महोत्‍सव नुकताच सावंतवाडीत झाला. यात कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध २२ प्रकारांमध्ये यश प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचा सत्‍कार कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात करण्यात आला. कणकवली कॉलेज संस्थेचे चेअरमन डॉ.अनंत नागवेकर, सचिव विजयकुमार वळंजू यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्‍यातील अंगभूत कलाकौशल्‍य जोपासून भविष्यात यशस्वी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. सोमनाथ कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. युवा महोत्सवात वैयक्तिक कला प्रकारांमध्ये सुयोग रहाटे, हर्ष नकाशे, प्रेम मेस्त्री, पार्थ मेस्त्री, शुभम जाधव, बूशरा बागवान व नम्रता परुळेकर यांनी, तर सांघिक कला प्रकारांमध्ये मैथिली चाळके, संदीप सोनम, आयुष तांबे, ऐश्वर्या सावंत, मानसी चाळके यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या विद्यार्थ्यांना प्राचार्य युवराज महालिंगे, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. सुरेश पाटील, सांस्कृतिक विभाग सदस्य डॉ. आशिष नाईक, डॉ. सुरेश हुसे, प्रा. सचिन दर्पे, डॉ. गीता कुणकवलेकर, प्रा. संदीप तेली, प्रा. सुकन्या तांबे, प्रा. मीनाक्षी सावंत, प्रा. प्रवीण कडूकर, प्रा. विजय सावंत, प्रा. स्वीटी जाधव, सागर माने, सागर सारंग, गौरी दळवी, प्रा. हरिभाऊ भिसे तसेच अभिनेते नीलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Marathi News Esakal
www.esakal.com