

- rat१७p९.jpg
P26O57782
विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करताना मान्यवर.
मुंडे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
मंडणगड ः ‘स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी नियमितता, सातत्य आणि मनापासून केलेली तयारी अधिक महत्त्वाची आहे. योग्य मार्गदर्शनाच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडवू शकतात,’ असे प्रतिपादन जिजाऊ संस्थेचे प्रकल्प संचालक संदीप पाटील यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ आणि ‘जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था’ (रत्नागिरी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, नीलेश गोवळे, नीलेश रक्ते, नितीन जाधव, मनोज पार्टे, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. मुकेश कदम, प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. विनोदकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.