कुवेशी शाळेत कार्यशाळा

कुवेशी शाळेत कार्यशाळा
Published on

- rat१७p१८.jpg-
26O57796
राजापूर ः हस्तकौशल्यातून ग्रीटिंग कार्ड बनविण्याचे प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनिल गोरे.

ग्रीटिंग कार्ड बनवण्याची
कुवेशी शाळेत कार्यशाळा
राजापूर ः विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांच्यात कल्पकता आणि हस्तकौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने कुवेशी जिल्हा परिषद शाळा क्र. १ येथे नुकतीच ‘ग्रीटिंग कार्ड बनवणे’ कार्यशाळा उत्साहात पार पडली. पदवीधर शिक्षक दीपक धामापूरकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यशाळेत प्रशिक्षक अनिल गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी रंगीत शाई, फोटो पेपर, ब्रश आणि कापूस अशा विविध साहित्यांचा खुबीने वापर करत अत्यंत सुंदर व नावीन्यपूर्ण ग्रीटिंग कार्ड्स तयार केली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका रंजना सोनवणे, उपशिक्षक संतोष डुमणे व मेघना जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

rat१७p१९.jpg -
26O57797
दाभट : तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संकेश कासारे यांचे अभिनंदन करताना ग्रामस्थ.

दाभटच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी संकेश कासारे
मंडणगड : दाभट ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संकेश बाळाराम कासारे यांची निवड झाली. कासारे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मंडणगड तालुका युवक सचिव म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या कासारे यांनी नागरिकांच्या विविध शासकीय कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील वाद विवाद सामोपचाराने सोडविणे, ग्रामस्थांमध्ये सलोखा व एकोपा निर्माण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे कासारे यांनी सांगितले.


rat१७p२०.jpg
26O57798
कुडूक बुद्रुक : बोरीचा कोंड येथे पर्यावरण संवर्धन उपक्रमातून वृक्षारोपण मोहिमेत सहभागी ग्रामस्थ, महिला, मुंबईकर, विद्यार्थी.

कुडूकबुद्रुकमध्ये १५० रोपांची लागवड
मंडणगड : पर्यावरण संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जपत कुडूक बुद्रुक बोरीचा कोंड येथे व्यापक वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट आहे, असा संदेश देत १५० रोपांची लागवड या उपक्रमातून करण्यात आली. ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई मंडळ, नवतरुण विकास मंडळ तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गावात प्रथमच व्यापक स्वरूपात राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आदर्शवत ठरला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, कुडूक बुद्रुक बोरीचा कोंड येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर नवतरुण विकास मंडळ, कुडूक बुद्रुक बोरीचा कोंड, ग्रामस्थ, महिला मंडळ व संलग्न मुंबई मंडळ यांच्या पुढाकाराने गाव परिसरात पर्यावरणपूरक वृक्षारोपण करण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com