ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास विकास

ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास विकास
Published on

rat१८p१७.jpg-
26O58044
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी महाविद्यालयात उद्योजक मल्हार मलुष्टे यांचा सत्कार करताना दत्तात्रय वालावलकर. सोबत शिल्पा तारगावकर, प्रा. प्रभात कोकजे, प्रा. भूषण केळकर.
----
विश्वासातूनच उद्योगाचा विकास
मल्हार मलुष्टे ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : ग्राहकांचा विश्वास संपादन करा म्हणजे विकास आपोआपच होईल, असे प्रतिपादन उद्योजक मल्हार मलुष्टे यांनी केले. ते अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शंकर ढोले स्टुडंट्स एनरिचमेंट सेल उपक्रमाअंतर्गत मुलाखतीवेळी बोलत होते.
कचरा व्यवस्थापन या विषयावर मलुष्टे यांनी माहिती दिली. ते पॉलिमर इंजिनिअर आणि प्लास्टिकपासून कच्चा माल तयार करतात. त्यांनी अभ्यंकर-कुळकर्णी महाविद्यालय ते उद्योजकतेपर्यंतचा प्रवास प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्वानंदी शेंबवणेकर, आदिती फडके, हिमांक खातू आणि स्वराज डोंगरे या विद्यार्थ्यांनी त्यांची प्रभावीपणे मुलाखत घेतली. व्यवसाय सुरू करण्यापासून ते आत्तापर्यंत त्यांना आलेले अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. तरुणपिढीने नोकरी शोधणारे न होता नोकरी निर्माण करणारे व्हावे त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य कशाप्रकारे आवश्यक आहे, हे मलुष्टे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या प्रसंगी पर्यवेक्षक दत्तात्रय वालावलकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com