कोकणच्या खाद्यपरंपरेचे जतन करणारे ‘रिगल रेसिपी’

कोकणच्या खाद्यपरंपरेचे जतन करणारे ‘रिगल रेसिपी’
Published on

‘रिगल रेसिपी’चे उद्या अनावरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः कोकणची समृद्ध, पारंपरिक आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम’ (कोंढे) येथील विद्यार्थ्यांनी ‘रिगल रेसिपी’ हे विशेष पाककृती पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाचे अनावरण गुरूवारी (ता.२०) सायंकाळी ५ वाजता कोंढे येथील ‘रिगल हॉल’मध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे कोकणातील अनेक दुर्मिळ, अस्सल आणि पारंपरिक पाककृती आजच्या पिढीपासून दुरावत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक खाद्यसंस्कृतीचे दस्तऐवजीकरण करून तिचे जतन करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाने हा उपक्रम राबवला आहे. ‘रिगल रेसिपी’ या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व पाककृती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयाच्या ट्रेनिंग किचनमध्ये तयार करून पाहिल्या आहेत. दुर्मिळ पाककृती शोधणे, साहित्य व प्रमाणबद्ध पद्धत समजून घेणे, प्रत्यक्ष पदार्थ तयार करून त्याची चव व सादरीकरण सुधारणे, अशा सर्व टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी काम केले आहे. पुस्तकात समाविष्ट सर्व छायाचित्रे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांचीच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com