संजू परब वाढदिवस विशेष

संजू परब वाढदिवस विशेष
Published on

swt१८१४.jpg
५७९७९
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासमवेत संजू परब, बाजूला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर.
swt१८१५.jpg
५७९८०
उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांच्या समवेत संजू परब.
swt१८१६.jpg ते swt१८२०.jpg
५७९८१
५७९८६
संजू परब.
swt१८२१.jpg
५७९८७
कुटुंबासमवेत संजू परब.
swt१८२२.jpg
५७९८८
आमदार निलेश राणे यांच्यासमवेत संजू परब.
swt१८२३.jpg
५७९८९
आमदार दीपक केसरकर यांच्यासमवेत संजू परब.
swt१८२४.jpg
५७९९०
शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पत्र स्विकारताना संजू परब.
-----------

डोके : मा. संजू परब वाढदिवस विशेष

लोककल्याणासाठी झटणारा झुंजार नेता

- रुपेश हिराप

लीड
कोणताही राजकीय स्वार्थ मनात न ठेवता, केवळ लोककल्याणाचा ध्यास घेऊन अहोरात्र राबणारा एक रोखठोक, बिनधास्त आणि बेधडक नेता म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्याकडे पाहिले जाते. आमच्या सुख-दुःखात धावून येणाऱ्या या धुरंधर नेत्याला भविष्यात आमदार म्हणून विधानभवनात पाहायचे आहे. ही आज सर्वसामान्य जनतेच्या मनातील सुप्त भावना आहे. अशा या झुंजार, डॅशिंग, राजकीय नेतृत्वाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा वाढदिवसानिमित्त घेतलेला आढावा.
---------------

​जिल्ह्याच्या राजकारणात अल्पावधीतच संजू परब यांनी स्वतःचे एक आगळेवेगळे वलय निर्माण केले आहे. शिवसेना शाखाप्रमुख, युवक काँग्रेस, स्वाभिमान तालुकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, सावंतवाडी नगराध्यक्ष ते शिवसेना जिल्हाप्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. मडूरासारख्या ग्रामीण भागातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या संजू परब यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणाचा श्रीगणेश केला. आमदार निलेश राणे यांचे एक अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत शिलेदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पूर्वी काँग्रेसमध्ये असताना विरोधकांना अंगावर घेत त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला होता. जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक पवित्रा घेत अनेक आंदोलने केली आणि प्रसंगी अंगावर केसेसही झेलल्या. याच संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेत सर्वाधिक ८ नगरसेवक निवडून आणले, तर जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ५ आणि पंचायत समितीच्या १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवून देत आपल्यातील धडाकेबाज नेतृत्वाची प्रचिती दिली.
​राणे साहेबांनी ''महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा''ची स्थापना केली, तेव्हा संजू परब यांनी राणे कुटुंबाची साथ देत खंबीर भूमिका घेतली. पुढे २०१९ मध्ये या पक्षाचे भाजपमध्ये विलीनकरण झाले. त्यानंतर झालेल्या सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत संजू परब उभे राहून विरोधकांना धूळ चारत विजय संपादन केला आणि सावंतवाडी शहरात प्रथमच भाजपचा झेंडा फडकवला. नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या हाती अवघा ७२० दिवसांचा कार्यकाळ होता आणि समोर कोरोनासारखे जागतिक संकट उभे होते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी विकासाची गती मंदावू दिली नाही. त्यांनी ४८ कोटींच्या नव्या नळ-पाणी योजनेचा प्रस्ताव सादर केला, अद्ययावत अग्निशामक दल इमारतीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या भव्य इमारतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अशा प्रकारे आपल्या दूरदृष्टीने त्यांनी यशस्वी नगराध्यक्ष कसा असावा, हे आपल्या कामातून दाखवून दिले.
​२०२४ मध्ये आमदार निलेश राणे यांच्यासोबत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची मोठी जबाबदारी सोपवली. नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीत विरोधकांनी त्यांना पराभूत करण्यासाठी चारी बाजूंनी राजकीय चक्रव्यूह रचला होता. एकाच प्रभागात संपूर्ण ताकद पणाला लावली गेली. परंतु, संजू परब यांनी आपल्या गनिमी काव्याने हा चक्रव्यूह भेदून विरोधकांना चारीमुंड्या चित केले आणि प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. या प्रवासात त्यांच्या धर्मपत्नी सौ. संजना परब यांचीही त्यांना खंबीर साथ लाभली. स्वतःच्या विजयासोबतच त्यांनी शिवसेनेचे ७ नगरसेवक आणि मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले.
​आतापर्यंतच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांची समर्थ साथ लाभली. संजू परब यांचे कार्यालय असो वा निवासस्थान, तिथे आजही सर्वसामान्य जनतेची सातत्याने रेलचेल पाहायला मिळते. मदतीची हाक घेऊन आलेला कोणताही व्यक्ती त्यांच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. समाजसेवेचे हे व्रत त्यांनी आजही तितक्याच नम्रतेने जपले आहे. त्यांची निर्णयक्षमता, कामाचा तगडा धडाका, विकासवादी दृष्टी आणि निर्भिड स्वभाव यामुळेच आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून संजू परब यांना विधानभवनात पाठवायचेच असा सूर उमटत आहे. आपल्या अचाट कार्यकर्तृत्वाच्या जोरावर ते निश्चितच विधानभवन गाठतील यात तीळमात्र शंका नाही. शिवसेनेच्या या धुरंधर, डॅशिंग आणि लोकप्रिय जिल्हाप्रमुखास वाढदिवसाच्या अनंत मनःपूर्वक शुभेच्छा!
--------

कोट
संजू परब हे एक संवेदनशील शिवसैनिक असून, बाळासाहेब ठाकरेंच्या ''८०% समाजकारण आणि २०% राजकारण'' या विचारांवर चालत पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांच्या कामावर खूश आहेत. निश्चितच भविष्यात संजू परब यांची राजकीय वाटचाल उज्वल असेल.
- उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य.
------

​संजू परब हे जनतेतून आणि जनतेसाठी काम करणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी नेहमी लोकांना न्याय दिला आहे. शिवसैनिक म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी शहर विकासाचे निर्णय घेतले. आज नगरसेवक म्हणूनही तितक्या जबाबदारीने ते आपली भूमिका पार पडणार आहे. निश्चितच त्यांचे राजकीय भविष्य उज्वल असेल.
- दीपक केसरकर, आमदार
--------

माझ्या राजकीय कारकीर्दीतील चढउतारामध्ये संजू परब हे नेहमीच माझ्या पाठीमागे भावासारखे खंबीर उभे राहिले आहेत. संजू हा राणे कुटुंबातील एक सदस्यच आहे. राणें कुंटूबांच्या प्रत्येक राजकीय निर्णयाचा त्यांनी सन्मान केला आहे. आज शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद सांभाळताना त्यांनी पक्षाला मोठे योगदान दिले आहे, पक्षाची भक्कम बाजू आज यशस्वीपणे सांभाळत आहेत. निश्चितच संजू परब यांच्या मनातील राजकीय इच्छा पूर्ण होईल या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- निलेश राणे, आमदार
----------

कोट
लोकांचा संग्रह हीच माझी संपत्ती
राजकारणात काम करत असतानाच नेहमी समाजकारणाला पहिले प्राधान्य दिले आहे. गोरगरिब जनतेची सेवा म्हणुनच आपण राजकारणाकडे पाहत आलो आहे. माझ्याकडे आलेला प्रत्येक घरची व्यक्ती कधीच निराश होऊन परत जाऊ नये, त्यासाठी माझी धडपड राहिली आहे. आणि यापुढेही राहील. लोकासांठी काम करतांना लोंकांच्या सुख दु:खात सहभागी होण्यास आनंद वाटतो कारण गोरगरिबांचे आर्शिवाद हे माझ्यासाठी खुप आहे याच आर्शिवादाच्या जोरावर तसेच आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या कृपाछत्रछायेखाली माझी पुढील राजकीय कारकीर्द नक्कीच उज्ज्वल असेल.
- संजू परब
--------------------------

कोट
राजकारणात काम करतांना पती संजू परब यांनी कधीच कोणाशी पक्षीय भेदभाव केला नाही.त्याचा फायदा त्यांना नेहमीच झाला आहे. राजकारणात काम करत असतांना कुंटूबालाही तितकाच वेळ ते देतांत, त्यांची राजकीय वाटचाल पाहता त्यांनी कधीच राजकीय स्वार्थ ठेवला नाही मिळेल ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. आजही त्यांच्याकडे मदतीसाठी आलेला व्यक्ती कधीच परतून गेलेला नाही. त्यांचे हे काम माझ्यासाठी नेहमीच अभिमानास्पद आहे एक पत्नी म्हणून त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी माझी त्यांना भक्कम साथ आहे आणि राहील. त्यांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा.
- संजना सच्चिदानंद परब
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com