नागपूर, मुंबई आणखी विशेष गाड्या

नागपूर, मुंबई आणखी विशेष गाड्या
Published on

नागपूर, मुंबई आणखी विशेष गाड्या

कोकण रेल्वे : गणेशोत्सवात चाकरमान्यांना आधार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १८: गणपती उत्सव आणि वीकेंडची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मडगाव-नागपूर आणि मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या मार्गावर ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान धावणाऱ्या या विशेष गाड्यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे : मडगाव-नागपूर-मडगाव विशेष ही मडगाव ते नागपूर (०११४०) दरम्यान दर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८ :२५ वाजता नागपूरला पोहोचेल. याच्या फेऱ्या १८, २५ ऑगस्ट आणि १, ८, १५ आणि २२ सप्टेंबर दरम्यान असतील. नागपूर ते मडगाव (०११३९) ही दर बुधवारी रात्री ११:४५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता मडगावला पोहोचेल. याच्या फेऱ्या १९, २६ ऑगस्ट आणि २,९, १६ आणि २३ सप्टेंबरला आहेत. याचे प्रमुख थांबे करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा असे असतील.
मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१००४): दर रविवारी दुपारी ३ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल. याच्या फेऱ्या २३, ३० ऑगस्ट आणि ६,१३, २० आणि २७ सप्टेंबरला आहेत. एलटीटी ते मडगाव (०१००३) गाडी दर सोमवारी सकाळी ७:५० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता मडगावला पोहोचेल. याच्या फेऱ्या २४, ३१ ऑगस्ट आणि ७,१४, २१ आणि २८ सप्टेंबर या तारखांना असून प्रमुख थांबे करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल आणि ठाणे असे असतील. दोन्ही गाड्यांना एकूण १९ डबे असतील.

Marathi News Esakal
www.esakal.com