कॅथॉलिक अर्बन बॅंकेचा २८० कोटींचा टप्पा पार

कॅथॉलिक अर्बन बॅंकेचा
२८० कोटींचा टप्पा पार
Published on

58008

कॅथॉलिक अर्बन बॅंकेचा
२८० कोटींचा टप्पा पार

वार्षिक सभा ः सभासदांना १४ टक्के लाभांश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः येथील कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सावंतवाडी या संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवसरणी केंद्र येथे संस्थेचे व्हाईस चेअरमन पीटर दिया यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली. संस्थेला ३१ मार्चअखेर ३ कोटी ३५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, संस्थेने २८० कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे.
संस्थेने जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण करताना ऑडिट वर्ग ‘अ’ची परंपरा कायम राखली आहे. चालूवर्षी सभासदांना १४ टक्के लाभांश मंजूर करून सभा चालू असतानाच सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आला. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून मिलाग्रीस चर्च सावंतवाडीचे पॅरीश प्रिस्ट फादर मिलेट डिसोजा उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे विशेष प्रावीण्य सभासद पाल्यांचा सत्कार करण्यात आला. फादर मिलेट डिसोजा यांची दक्षिण डीनरीचे डीन म्हणून निवड झाल्याब‌द्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सदस्य मायकल फ्रान्सिस डिसोजा, पंचायत समिती सदस्य मायकल कोजमा डिसोजा, मालवणच्या नगरसेविका अनिता गिरकर, राज्यस्तरीय पर्यावरणमित्र पुरस्कारप्राप्त जोवेल डिसिल्व्हा, डॉ. साहाय्यक पोलिस निरीक्षक मणिक डिसोजा यांना गौरविले. इतिवृत्ताचे वाचन सचिव जॉनी फेराव यांनी, अहवाल वाचन सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जिस यांनी केले. सूत्रसंचालन फ्रॅन्की डॉन्टस यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com