चिपळूण ः खाद्यपदार्थ विक्रीत तांत्रिक, व्यावहारिक अडचणी

चिपळूण ः खाद्यपदार्थ विक्रीत तांत्रिक, व्यावहारिक अडचणी
Published on

58068

खाद्यपदार्थ विक्रीत तांत्रिक, व्यावहारिक अडचणी
चिपळूणमधील स्थिती; खानावळी, उपाहारगृह बंदची भीती
चिपळूण, ता. १८ : अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेली तपासणी आणि कारवाई यामुळे चिपळूण शहरातील छोट्या खानावळी, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये व्यवसाय बंदची भीती निर्माण झाली आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक असले तरीही नियमांची पूर्तता करताना येणाऱ्या तांत्रिक व व्यावहारिक अडचणींचा प्रशासनाने विचार केला पाहिजे, अशी मागणी खाद्य व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
चिपळूण शहरातील रस्त्यांलगतच्या स्ट्रीटफूडच्या व्यवसायामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात सुमारे ४०० हातगाड्यांवर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विकले जात असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांच्या झालेल्या बैठकीत मांडली होती. त्यातील काही व्यावसायिकांकडे आवश्यक अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणी नाही. अन्न व औषध प्रशासनाकडून चिपळूणमधील हॉटेल, उपाहारगृह आणि खानावळी तपासल्या जात आहेत. चायनीज आणि वडापाव विक्रेत्यांकडेही चौकशी होत आहे. शहरात स्थानिक खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारचे स्ट्रीटफूड नागरिकांना सहज उपलब्ध होते. कमी किमतीत आणि सहज मिळणारे खाद्यपदार्थ यामुळे फूडस्ट्रीटचे महत्व वाढले आहे; मात्र खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, पिण्याचे पाणी, स्वच्छता, अन्न साठवणूक आणि खाद्यपदार्थ हाताळण्याची पद्धत याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अनेक लघुव्यावसायिक कमी भांडवलावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना परवाना प्रक्रिया, कागदपत्रे, स्वच्छतेचे निकष आणि इतर नियमांची पूर्तता करताना अडचणी येत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी बैठकीत मांडले होते.

कोट
चिपळूणला कोकणी खाद्यसंस्कृतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. स्थानिक पदार्थांची चव घेण्यासाठी नागरिकांसह पर्यटकही उत्सुक असतात. त्यामुळे खाद्य व्यवसाय वाढणे ही शहराच्या पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब आहे; मात्र त्याचवेळी ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
- श्वेता शेटे, खानावळ चालक, चिपळूण

कोट
अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. चिपळूणची खाद्यसंस्कृती टिकवायची असेल तर लघु खाद्य व्यावसायिकांना नियमांचे मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा देतानाच ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- भाग्यश्री परदेशी, प्रभारी अन्नसुरक्षा अधिकारी, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com