दापोली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

दापोली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
Published on

अमृते यांच्यावरील
पुस्तकाचे प्रकाशन
दापोली ः सामाजिक बांधिलकी, समाजोपयोगी कार्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण करणारे (कै.) अरविंद अमृते यांच्या जीवनकार्याचा प्रवास आता पुस्तकाच्या रूपाने भावी पिढीसमोर आला आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन झाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवाजीनगर येथील शिंदे सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी कुलगुरू डॉ. संजय भावे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, दापोलीचे सभापती उन्मेष राजे, नगराध्यक्षा कृपा घाग, अमृते सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शैला अमृते, डॉ. तोराणे आदी उपस्थित होते. कै. अरविंद अमृते यांच्या सामाजिक कार्याचा, समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा मान्यवरांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख पुढील पिढीला व्हावी, तसेच त्यांच्या सामाजिक वाटचालीतून समाजाला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
---------
ठाकरे सेनेच्या २१ ला
संघटनात्मक बैठका
चिपळूण ः कोकणातील संघटन मजबूत करण्यासाठी २१ ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे सेनेच्या संघटनात्मक बैठका होणार आहेत. उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठका होणार आहेत. या बैठकीत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि उपनेते विजय कदम मार्गदर्शन करणार आहेत. कोकणातील शिवसेनेची ताकद मजबूत करून पुन्हा एकदा कोकण भगवेमय करण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बैठका आयोजित केल्या आहेत. गुरूवारी (ता. २०) सकाळी साडेदहा वाजता चिपळूण येथील माटे सभागृहात उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची बैठक होईल. दुपारी तीन वाजता रत्नागिरीत शासकीय विश्रामगृह येथे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याची बैठक होणार आहे.
--------
अमोल पालयेंच्या
‘गावकी’चे प्रकाशन
रत्नागिरी ः रत्नागिरीतील संगमेश्वरी-तिलोरी बोलीतील लेखक अमोल पालये यांच्या ‘गावकी’ या संगमेश्वरी बोलीतील पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी, ज्येष्ठ लेखक, नाटककार श्रीकृष्ण जोशी, प्रसिद्ध गझलकार देविदास पाटील यांच्याहस्ते झाले. जनसेवा ग्रंथालयातर्फे हा कार्यक्रम झाला. गावकी हा कथासंग्रह महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रसिद्ध झाला आहे. कोकणातील विषयांवर लेखन करावं, असं वाटत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील ‘गावकी’ हा विषय निवडला आणि त्या अनुषंगाने कथा लिहिल्याचे अमोल पालये यांनी सांगितले. गझलकार देविदास पाटील यांनी ‘गावकी’चा परिचय घडवला. कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, बालरोगतज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई, जनसेवाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी, कार्यवाह ओंकार मुळ्ये, डॉ. दिलीप पाखरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com