

‘स्टार स्वरोजगार’ संस्थेत
पर्यटनावर मोफत प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे १ ते १० ऑक्टोबर या १२ दिवसांच्या कालावधीत टुरिझम प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण हे सलग असून सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत असणार आहे.
यात रत्नागिरी जिल्हा पर्यटन महत्व, ऐतिहासिक पर्यटन, जल पर्यटन, कृषी पर्यटन, खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे या विषयी माहिती देण्यात येईल. रत्नागिरीमधील पर्यटनस्थळांना प्रशिक्षण कलावधीत भेटी दिल्या जातील. तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास व उद्योजकता विकास या विषयी मार्गदर्शन दिले जाईल. प्रशिक्षणात प्रशिक्षण, चहा नाश्ता, जेवण, निवास व्यवस्था आदी पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी वयोमार्यादा १८ वर्ष पूर्ण व ५० वर्षापर्यंत आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार रत्नागिरी जिल्ह्याचा रहिवासी असावा. उमेदवार उमेद बचतगटातील सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती किंवा एसईसीसी किंवा मनरेगा यापैकी एका पात्रतेत पात्र असणारी व्यक्ती प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वक्रतुंड अपार्टमेंट जवळ, निसर्ग वसाहत, शांतीनगर, नाचणे रोड, रत्नागिरी येथे अर्ज आणून द्यावेत, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.