साखरप्यात भरमसाठ विजबिले, ग्राहक संतापले

साखरप्यात भरमसाठ विजबिले, ग्राहक संतापले
Published on

साखरप्यात भरमसाठ वीजबिले, ग्राहक संतापले
साखरपा, ता. १९ ः साखरपा गाव आणि परिसरातील पंचक्रोशीत महावितरणच्या अजब कारभाराचा थेट फटका सामान्य वीजग्राहकांना बसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मीटर रीडिंग न घेता सरासरी बिले पाठवल्यानंतर, आता दोन महिन्यांचे रीडिंग एकाच बिलात जोडल्याने ग्राहकांना हजारो रुपयांची वाढीव बिले आली आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
गेले दोन महिने महावितरणचा कोणताही कर्मचारी गावात रीडिंग घेण्यासाठी आला नाही. त्या काळात सरासरी बिले पाठवली; मात्र, चालू महिन्यात कर्मचाऱ्याने थेट येऊन दोन्ही महिन्यांचे युनिट्स एकाच बिलात जोडले. दोन महिन्यांचे रीडिंग एकत्र आल्यामुळे विजेचा वापर उच्च स्लॅबमध्ये गेला आणि ग्राहकांना चढ्या दराने भरमसाठ बिल आले आहे.
वाढीव बिल दुरूस्तीसाठी साखरपा महावितरण कार्यालयात जाणाऱ्या ग्राहकांना तेथील कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तनाचा सामना करावा लागत आहे. बिल दुरूस्त करायचे असेल तर देवरूख कार्यालयात जा, अशी उत्तरे देऊन ग्राहकांना पिटाळून लावले जात आहे. आधीच महावितरणच्या चुकीमुळे बसलेला आर्थिक फटका, त्यात देवरूखच्या फेऱ्या, प्रवासाचा खर्च आणि मनस्ताप यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. महावितरणने साखरपा परिसरातील वाढीव बिले तातडीने दुरूस्त करून योग्य त्या स्लॅबनुसार आकारावीत, अशी आक्रमक मागणी वीजग्राहकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com