परुळे बाजार येथे आज नारळ लढविणे स्पर्धा

परुळे बाजार येथे आज नारळ लढविणे स्पर्धा
Published on

परुळे बाजार येथे आज नारळ लढविणे स्पर्धा
म्हापण : शिवशाही परुळे यांच्या वतीने पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य नारळ लढविणे स्पर्धा २०२६ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे हे पाचवे पर्व असून उद्या (ता.२०) सायंकाळी ४ वाजता, वराठी मंगल कार्यालय, परुळे बाजार येथे स्पर्धा रंगणार आहे. मंडळाकडून प्रत्येक स्पर्धकास ५ नारळ देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांसह कायमस्वरूपी चषक ठेवण्यात आले आहेत. प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपये व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा आयोजकांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसारच स्पर्धा पार पडणार असून पंचांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकास स्पर्धेतून बाद करण्यात येईल. तसेच प्रथम येणाऱ्या १५० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धेचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने स्पर्धकांसह रसिकांनाही घरबसल्या या रोमांचक स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com