

swt205.jpg
58447
माड्याचीवाडी : सद्गुरू गावडेकाका महाराज यांचे स्वागत करताना मनीष नाईक, आनंद सावंत.(छाया : राकेश केसरकर)
विद्यार्थ्यांनी योगातून ताणतणाव दूर करावा
गावडेकाका महाराज : माड्याचीवाडी येथे मन ही एक अद्भुत शक्ती कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करावी लागते. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून थोडे दूर राहून अभ्यासाचा मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी योग कार्यशाळेत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनातून आपल्या जीवनात योग्य उपयोग करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, असे प्रतिपादन श्री श्री श्री १०८ महंत सद्गुरु गावडेकाका महाराज यांनी केले.
श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी कुडाळ याचा सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मन ही एक अद्भुत शक्ती ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन श्री गावडे काका महाराज यांनी केले. स्वागत मनीष नाईक यांनी केले. यावेळी राकेश केसरकर, आनंद सावंत, दिलीप सुतार, रश्मी डिचोलकर, साई पेडणेकर उपस्थित होते. श्री गावडेकाका महाराज म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून थोडे दूर राहून अभ्यासाचा मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी या कार्यशाळेत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनातून आपल्या जीवनात योग्य उपयोग करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आंतरराष्ट्रीय योगशिक्षक आनंद सावंत आणि तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन हे विद्यार्थी वर्गाला यशस्वी होण्यासाठी अनमोल ठरत आहे. अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. आई-वडिलांनी पाल्यावर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या पाल्याला कोणती आवड आहे, हे पाहूनच त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजेच तो विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ठिकाणी सुप्त गुण असतात ते ओळखणं गरजेच आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळू शकते.
या कार्यशाळेत आजच्या स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात परीक्षेची भीती, मानसिक ताण-तणाव, एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे, आत्मविश्वास ढासळणे, या सर्व समस्यावर योगशास्त्राच्या शास्त्रशुद्ध व अनुभवावर आधारित उपायाद्वारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगशिक्षक आनंद सावंत यांनी मार्गदर्शन केले. एकाग्रता वाढवणारी योग साधने, ताण कमी करणारे प्राणायाम, मन स्थिर करणाऱ्या मुद्रा, त्राटक डोळे व मन एकाग्र करण्याची प्रभावी योग साधना, धारणा- विचारांना एका बिंदूवर स्थिर करण्याचे तंत्र, योगिक दृष्टिकोनातून अभ्यास स्मरणशक्ती व अभ्यासात यशाचे सर्व मार्गदर्शन देण्यात आले. सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.