

58453
मिलाग्रीस हायस्कूलतर्फे
‘नशामुक्त भारत’ रॅली
सावंतवाडी, ता. २१ ः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील मिलाग्रीस प्रशालेमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ‘नशामुक्त भारत’ अभियानाअंतर्गत विशेष शपथ ग्रहण आणि मानवी साखळी करून विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचा संदेश दिला.
रॅलीदरम्यान ‘नशामुक्त भारत’ घडवण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीत गायन केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. या रॅलीसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फा. रिचर्ड सालदान्हा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या सुपरवायझर संध्या टीचर, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.