

swt२०२५.jpg
५८५०१
मालवण ः येथील महावितरण कार्यालयात ऊर्जा मित्र बैठक पार पडली.
भरमसाठ बिलांच्या प्रश्नावर संताप
मालवणात ऊर्जामित्र बैठक ः ग्राहकांनी वाचला समस्यांचा पाढा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय येथे विद्युत वितरण, ग्राहक पंचायत शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांची संयुक्त ‘ऊर्जा मित्र बैठक’ आज पार पडली. या बैठकीत उपस्थित वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष शेतीपंप उपलब्ध असतानाही आलेले भरमसाठ वीज बिल, नवीन घरगुती वीज जोडणीसाठी सर्व्हिस लाईन मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी आदी प्रश्न मांडण्यात आले. उपस्थित सहाय्यक अभियंत्यांनी या सर्व तक्रारींची गांभीर्याने नोंद घेतली.
बैठकीदरम्यान मालवण शहरातील रखडलेल्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या कामाबाबत प्रश्न विचारला असता महावितरणच्या अभियंत्यांनी सांगितले की, महावितरणने नगरपालिकेकडे सादर केलेल्या अहवालानंतर, पालिकेकडून खोदाई आणि दुरुस्तीपोटी ७ कोटी १५ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष नियमानुसार महावितरणचा ठेकेदार जेवढी खोदाई करेल, त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी आणि तरतूद ठेकेदाराचीच असते. पालिकेला एवढी मोठी रक्कम भरणे महावितरणला शक्य नसल्याने हे काम सध्या रखडले आहे. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी आणि समोरासमोर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी २ सप्टेंबरला नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
या बैठकीला ग्राहक पंचायत मालवण शाखा सहसंघटक वफा खान, शहर सहाय्यक अभियंता प्रथमेश मयेकर, ग्रामीण सहाय्यक अभियंता राहुल केकान, ग्राहक पंचायत अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष प्रताप बागवे, सहसंघटक वफा खान, सहसंघटक महेश काळसेकर, सचिव नीळकंठ मालणकर, कोषाध्यक्ष सुरेल परब, जिल्हा सदस्य प्रमोद मोहिते, वीज ग्राहक सदाशिव आरोलकर, हेमंत कोचरेकर, शिशुपाल राणे, सुशांत तायशेटे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.