

P26O58755
एआय चित्र
शिक्षक होणार ‘एआय’साक्षर
‘एआय साथी फॉर एज्युकेटर्स’; ३० सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः बदलत्या शैक्षणिक पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर लक्षात घेता शिक्षकांनाही या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ‘एआय साथी फॉर एज्युकेटर्स’ हा ऑनलाइन कोर्स शिक्षकांना अनिवार्य करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेपाच हजार शिक्षक असून त्या सर्वांना हा कोर्स करावा लागणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. पहिली ते बारावीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एआयचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. या प्रशिक्षणातून अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत एआयचा वापर, त्याची उपयुक्तता आणि तांत्रिक बाबींची माहिती शिक्षकांना मिळणार आहे.
या कोर्ससाठी चार तासांचे सीपीडी (सतत व्यावसायिक विकास) प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे. शिक्षकांनी ३० ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करून ३० सप्टेंबरपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित कालावधीत सर्व शिक्षकांनी या कोर्ससाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. पहिली ते बारावीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ५० तासांचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रशिक्षण आता पूर्ण करायचे असून त्याबाबतचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
---
दृष्टिक्षेपात
एआय म्हणजे काय आणि शिक्षणातील त्याचा उपयोग
चॅट जीपीटीसारख्या एआय साधनांचा शैक्षणिक वापर
पाठयोजना, प्रश्नपत्रिका, शैक्षणिक साहित्य तयार करणे
विद्यार्थ्यांच्या अध्यापनात एआयचा योग्य वापर
एआय वापरताना गोपनीयता व नैतिक बाबी
---
पहिली ते बारावीच्या अध्यापनात वापर
‘एआय साथी फॉर एज्युकेटर्स’ या कोर्समध्ये पहिली ते बारावीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता यावा, या उद्देशाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना एकूण ५० तासांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यापैकी ३० तासांचे ऑनलाइन तर उर्वरित २० तासांचे प्रशिक्षण वर्षभरात ऑफलाइन पद्धतीने घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.