

- rat२१p९.jpg-
26O58667
लांजा ः विलवडे रेल्वेस्टेशन प्रमुख सुबोध भाटकर यांना संघटना कार्यकारिणीतर्फे निवेदन देताना पदाधिकारी.
विलवडेत एक्स्प्रेसना थांबा द्या...
प्रवासी संघटनेची मागणी ; अन्यथा २० सप्टेंबरला उपोषण
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २१ ः विलवडे रेल्वेस्टेशनवर जोपर्यंत मागणी केलेल्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, असा ठाम निर्धार ‘विलवडे रेल्वेस्थानक प्रवासी संघटने’च्या बैठकीत करण्यात आला.
विलवडे येथे बुधवारी (ता. १९) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानकावर सर्व प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती करावी, सुसज्ज प्रतीक्षालय (वेटिंग रूम), पथदीप, पोहोच रस्ता, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचा मार्ग व तेथील प्रकाशव्यवस्था, खेड ते सावंतवाडी लोकल, प्रवासीशेड आणि स्वच्छतागृहासारख्या विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाला यापूर्वी निवेदन देण्यात आले होते; मात्र, प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, काही प्रसंगी खोटी माहिती दिली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी २० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपोषणाची जबाबदारी ‘विलवडे रेल्वेप्रवासी संघटना’ मुंबई आणि ग्रामीण या दोन्ही शाखा संयुक्तपणे पार पाडणार आहेत. या बैठकीत मुंबई संघटनेचे सल्लागार सुभाष लाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीनंतर संघटनेच्या कार्यकारी समितीतर्फे विलवडे रेल्वेस्टेशन प्रमुख सुबोध भाटकर यांना मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले. या सभेला लांजा तालुक्याच्या पूर्व भागासह राजापूर तालुक्यातील कार्यकर्ते व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
आंदोलनाची अशी आहे रूपरेषा
* विलवडे रेल्वेस्थानकासमोर २० सप्टेंबर रोजी उपोषण
* मागण्या पूर्ण न झाल्यास बेलापूर मुख्यालयासमोर २३ ऑक्टोबरला उपोषण
* रेलरोको २३ नोव्हेंबरला आंदोलन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.