

rat२१p८.jpg-
26O58666
रत्नागिरी ः राजेश गोसावी.
राजेश गोसावी यांना पुरस्कार जाहीर
रोटरी क्लब; ५ सप्टेंबरला वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : तालुक्यातील झरेवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळांतील शिक्षक राजेश गोसावी यांना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी पुरस्कार वितरण होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबवून गोसावी यांनी शिक्षणक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. जिल्हा परिषद मराठी शाळा टिकवण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले असून, शाळेतील उपक्रमांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवली आहे. नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक तसेच ग्रंथनिर्मिती स्पर्धेतही जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्यात त्यांच्या योगदानाचा महत्त्वाचा वाटा आहे. तसेच ३५ हून अधिकवेळा रक्तदान करून सामाजिक कार्यातही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लबने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.