तालुक्यातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करा

तालुक्यातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करा
Published on

- rat21p10.jpg-
26O58678
दापोली ः आमदार प्रमोद जठार यांना निवेदन सादर करताना भाजप मंडणगड तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडीक व पदाधिकारी, कार्यकर्ते.
---
प्रलंबित विकासकामे पूर्ण करा
भाजप पदाधिकारी ; आमदार जठार यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. 21 ः तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांचे प्रश्न यांना गती देऊन शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजपचे मंडणगड तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडीक यांनी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे केली.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि मागण्या राज्यशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यासाठी दापोली येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात 20 ऑगस्ट रोजी ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले होते. मंडणगड येथील या अभियानाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्याधिकारी संतोष साखरे आणि भाजप आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडणगड तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडीक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार प्रमोद जठार यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांचे प्रश्न आणि मागण्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. तालुक्यातील कामांना गती देऊन शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. नागरिकांच्या समस्यांवर लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार जठार यांनी दिले.
या शिष्टमंडळात पृथ्वीराज चव्हाण, आनंद नारकर, आकाश नाविलकर, रामदास भागडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सेवा अभियानाला भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जया साळवी, जिल्हाध्यक्ष (ग्रामविकास व पंचायत राज सेल) योगेश शिर्के आणि युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com