

58691
कुडाळ कुंभारवाडा शाळेतून
सीमेवर जवानांसाठी राख्या
कुडाळ, ता. २२ : देशाच्या सीमेवर रक्षणासाठी तैनात असलेल्या वीर जवानांप्रती आदर, अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंभारवाडा येथील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या २०० राख्या जवानांसाठी पाठविल्या.
‘तुम्ही सीमेवर लढता म्हणून आम्ही सुरक्षित जीवन जगत आहोत,’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. जवानांना राखी बांधणे म्हणजे देशाच्या सीमेवर देशसेवेसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक वीर जवानाला आपल्या परिवारातील सदस्य मानून त्यांच्याप्रती बंधुभाव व्यक्त करणे, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या मनातील देशभक्तीची ज्योत सदैव प्रज्वलित राहावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अरविंद करलकर, मुख्याध्यापिका सायली कदम, उपशिक्षक विजय धामापूरकर, गुरुप्रसाद सावंत, वंदना परब, गौरी गोसावी, ऋतुजा गावडे, स्वराली लाड, चैत्राली पाटील, दीपाली मोहिते, कुडाळ औद्योगिक समूह पोस्टचे पोस्टमास्टर विकास वर्मा, गिरीश बोवलेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.