

58695
नाईकांमुळेच ‘कुडाळ-मालवण’ मागे
दत्ता सामंत : आमदार राणेंमुळेच विकासाचा महामेरू
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : माजी आमदार वैभव नाईक यांच्या डोक्यातील ‘वरचा मजला’ पूर्णपणे रिकामा आहे. १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघाचा विकास करायचा सोडून स्वतःचे वजन वाढवण्यापलीकडे काहीही केले नाही. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात त्यांनी कुडाळ-मालवणला २५ वर्षे मागे ढकलण्याचे पाप केले, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
श्री. सामंत यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर आदी उपस्थित होते. आमदार नीलेश राणे यांच्या धडक आणि गतिमान नेतृत्वामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात विकासाचा महामेरू उभा राहिला आहे. यामुळेच राजकीय अस्तित्व संपलेल्या वैभव नाईक यांच्या पोटात भयंकर शूळ उठला आहे, असा टोलाही सामंत यांनी लगावला.
श्री. सामंत यांनी नाईक यांच्या दाव्यांवर प्रत्युत्तर दिले. ‘‘२०२४ च्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिवसेनेतून मदतीची अन् उमेदवारीची विचारणा केली होती. मात्र, मी नीलेश राणेंना शब्द दिल्याने निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यावेळी वैभव नाईक स्वतः शिंदे गटात येण्यास उतावीळ झाले होते. मात्र, तिथे नीलेश राणेंशिवाय पर्याय नाही आणि आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पळ काढला. आता ते गद्दारीचा कलंक पुसण्याचे नाटक करत खोटारडेपणा करत आहेत.
श्री. सामंत पुढे म्हणाले, नाईक यांच्याकडे जरा तरी बुद्धी अन् कर्तृत्व असते, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळाले असते. मात्र, ठाकरेंनाही त्यांची क्षमता उत्तम ठाऊक होती. विधिमंडळात एकही ठोस प्रश्न न मांडता, १० वर्षे केवळ पर्ससीन अन् पारंपरिक मच्छीमारांमध्ये वाद लावून स्वतःची टक्केवारी साधली. मामा वरेरकर नाट्यगृह, भुयारी गटार योजना आणि मालवणची ४६ कोटींची पाणी योजना १० वर्षे धुळखात ठेवून जनतेची दिशाभूल केली.
--------
दीड वर्षांत ऐतिहासिक निधी
आमदार राणे यांनी अवघ्या दीड वर्षांत मतदारसंघात आणलेल्या ऐतिहासिक निधीचा पाढा दत्ता सामंत यांनी वाचला. कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी महावितरणची पहिली भुयारी विद्युत वाहिनी अन् मालवणमध्ये अनेक सब-स्टेशन्सची मंजुरी. कुडाळ-मालवणच्या विकासासाठी ३०० कोटींचा निधी, मामा वरेरकर नाट्यगृहाचे पुनरुज्जीवन, रॉक गार्डन विकास आणि संरक्षक बंधारे. कोकणातील दशावतारी कलाकारांसाठीचा निधी २ कोटींवरून थेट ४ कोटींपर्यंत दुप्पट वाढवून घेतला. शासकीय निधीव्यतिरिक्त आमदार राणे यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल १५ ते २० कोटी रुपये खर्चून सामान्य जनतेच्या समस्या सोडवल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.