रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
Published on

मृद, जलसंवर्धन
रिल्स स्पर्धा
रत्नागिरी ः माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आणि मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाची दखल घेत मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धेसाठी रील्स अपलोड करण्याची मुदत आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
------
दिवाणी न्यायालयाचे
आज उद्घाटन
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील न्यायव्यवस्थेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नूतन दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन शनिवारी (ता. २२) सकाळी १० वाजता होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात होणार आहे. चिपळूण तालुक्यासाठी वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय सुरू होत असल्याने नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी अन्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. तसेच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होणार असल्याने तालुक्यातील नागरिक, पक्षकार तसेच वकिलांसाठी ही बाब महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या कार्यक्रमासाठी चिपळूण तालुका वकील संघाचे अध्यक्ष नितीन सुभाष सावंत यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
----------
rat२१p१५.jpg
58703
स्वरा मेस्त्री

लांजा आगरवाडी
शाळेचे सुयश
लांजा ः चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लांजा आगरवाडी शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, स्वरा मेस्त्री हिने २२० गुणांसह शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ११८वा क्रमांक पटकावला. शिष्यवृत्ती परीक्षेत आगरवाडी शाळेने उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेस बसलेले तिन्ही विद्यार्थींपैकी सर्व पात्र व एक शिष्यवृत्तीधारक ठरल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.‌ यामध्ये स्वराने २२० गुण मिळवले (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ११८वा क्रमांक) तसेच अवनी रामाणेने १९२ गुण, राज रांबाडेने १८२ गुण मिळवले.
----------
सावर्डेत आज
सकल हिंदू मेळावा
चिपळूण ः तालुक्यातील सावर्डे येथे हिंदू संमेलन समितीच्यावतीने पंचक्रोशीतील सकल हिंदू समाजाचा हिंदू मेळावा शनिवारी (ता. २२) होणार आहे. सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत सावर्डे येथील पवार सॉ मिल, श्री देव केदारनाथ सहाणेसमोर होणार आहे. हिंदू समाजातील एकता, सामाजिक सलोखा, संस्कृतीचे जतन व भावीपिढीपर्यंत सनातन धर्माची मुल्ये पोहोचवण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या वेळी उद्योजक केतन पवार, नंदकिशोर मालेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com