ठिबकणाऱ्या पावसाच्या पाण्यात गिरवताहेत शिक्षणाचे धडे

ठिबकणाऱ्या पावसाच्या पाण्यात गिरवताहेत शिक्षणाचे धडे
Published on

rat२१p१७.jpg
58705
राजापूर ः अर्धवट स्थितीमध्ये असलेले शाळा दुरूस्ती काम.
rat२१p१८.jpg
58706
राजापूर ः लाकडी बांधकाम मोडकळीस येऊन धोकादायक झालेल्या शाळेची पाहणी करताना शाखा अभियंता संतोष भालेकर.
----------

ग्राऊंड रिपोर्ट - लोगो

ठिबकणाऱ्या पावसाच्या पाण्यात गिरवताहेत धडे
११७ शाळांच्या इमारती धोकादायक; छप्पर दुरूस्तीसाठी हवेत ५ कोटी
राजापूर, ता. २१ ः तालुक्यातील तब्बल ११७ जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची छप्परे अत्यंत नादुरूस्त झाली असून, पावसाचे पाणी ठिबकणाऱ्या आणि धोकादायक छप्परांखालीच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. या शाळांची दुरूस्ती व नवीन वर्गखोल्यांच्या उभारणीसाठी सुमारे ५ कोटी ९ लाख रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता आहे. दरम्यान, प्रशासकीय स्तरावर सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असून, येत्या दोन दिवसांत याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
तालुक्यातील ७० शाळांच्या इमारतींची छप्परे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत तर ४७ शाळांची तत्काळ दुरूस्ती होणे गरजेचे आहे. बहुतांश शाळा ३० वर्षांपेक्षा जुन्या असून, काही ठिकाणी छप्पराच्या लाकडी रिपा तुटण्याच्या स्थितीत आहेत. गत आठवड्यात कोंड्ये येथील शाळेत छप्पराची रिप कोसळण्याची दुर्घटना घडली होती. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मे-जून महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही दुरूस्ती कामे रखडली होती. जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने धोकादायक शाळांचे सर्व्हेक्षण सुरू केले असून, दुरूस्तीचे अंदाजपत्रक (एस्टिमेट) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर शासनाकडून या कामांसाठी आवश्यक निधी मंजूर होणार का, याकडे पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचे लक्ष लागले आहे.

चौकट
पटसंख्या ठरणार कळीचा मुद्दा
तालुक्यातील दुरूस्तीची गरज असलेल्या चौथीपर्यंतच्या शाळांमध्ये २ ते १७ तर सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये ५ ते ८३ अशी पटसंख्या आहे. कमी पटसंख्येच्या शाळा भविष्यात बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे छप्पर दुरूस्ती आणि नवीन बांधकामासाठी निधीचा प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्यांची ''पटसंख्या'' हा कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

चौकट
58778

दृष्टिक्षेपात शाळा दुरूस्ती
* एकूण इमारत दुरूस्तीच्या शाळा ः ११७
* तत्काळ इमारत दुरूस्ती शाळा ः ४७
* संपूर्ण छप्पर दुरूस्ती शाळा ः ७०
---------
चौकट
दृष्टिक्षेपात इमारत दुरूस्ती अपेक्षित निधी
* इमारत दुरूस्तीसाठी अपेक्षित निधी ः ५ कोटी ९ लाख
* तत्काळ इमारत दुरूस्ती अपेक्षित निधी ः ३ कोटी ३ लाख ८० हजार
* इमारत धोकादायक अपेक्षित निधी ः २ कोटी ५ लाख २० हजार
--
कोट १
राजापूर तालुक्यातील धोकादायक आणि तत्काळ इमारत दुरूस्ती असलेल्या शाळांची सविस्तर माहिती आणि अहवालासह प्रत्यक्ष कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून बांधकाम विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शाळांचे सर्व्हेक्षण सुरू आहे तसेच इमारत दुरूस्ती वा नवीन बांधकामाच्या अंदाजपत्रकाचा सविस्तर अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- संतोष भालेकर, शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम
--
कोट २
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छप्पर नादुरूस्त आहे. छप्पराच्या लाकडी रिपा, वासे खराब झाले असून ते कधीही मोडण्याच्या स्थितीत आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळा सुरू होण्यापूर्वी इमारतीची तातडीने छप्पर दुरूस्ती होणे गरजेचे आहे. त्याबाबत ठोस निर्णय होऊन कार्यवाहीची अपेक्षा आहे.
- वसंत घाडी, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com