‘मातृ-पितृ वंदना’वर ३० ला निबंध स्पर्धा

‘मातृ-पितृ वंदना’वर ३० ला निबंध स्पर्धा
Published on

‘मातृ-पितृ वंदना’वर ३० ला निबंध स्पर्धा
वेंगुर्ले ः जीवनात आई-वडिलांचे मोल अनन्यसाधारण आहे. आई वडिलांचा मानसन्मान राखणे, आदर करणे, आणि संस्कारित जीवन जगणे यासाठी श्री देव वेतोबा देवस्थान आरवली, जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ मळेवाड, दशक्रोशी, आरंभ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, भगवदगीता भक्त परिवार शिरोडा पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्टला सायंकाळी ३ वाजता चार गटांसाठी ‘मातृ-पितृ वंदना’ या निबंध स्पर्धा श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृह आरवली येथे आयोजित केली आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, कान आठवी ते दहावी, खुलागट असे चार गट आहेत. या निबंध स्पर्धेत प्रत्येक गटासाठी शब्द मर्यादा ५०० शब्द असून निबंध स्वहस्ताक्षरात लिहून २७ ऑगस्टपर्यंत श्री देव वेतोबा देवस्थान कार्यालयात रमण शेलटे यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी जयवंत राय आरवली किंवा प्रमोद नाईक (शिरोडा), लक्ष्मण साळगांवकर (तिरोडा) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
सावंतवाडीत भाजपचे २४ ला सेवा अभियान
सावंतवाडी ः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ आयोजित केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित विकासकामे, विविध समस्या, शासकीय कामे व मूलभूत सुविधांबाबतची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. २४ ला सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत काझी शहाबुद्दीन सभागृह, सावंतवाडी येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या ज्या समस्या अथवा विकासकामे प्रलंबित आहेत, त्याबाबतची माहिती व निवेदने या अभियानाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. संबंधित गावातील नागरिकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे. त्यांच्या प्रश्नांचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, यासाठी त्या-त्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सेवा अभियानास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com