

rat२१p२९.jpg-
26O58780
साखरपा : शिव्यामुक्ततेची शपथ घेताना विद्यार्थी आणि चक्रभेदीच्या वैदेही सावंत.
वाशीतर्फे देवरूख शाळा ‘शिवीमुक्त’
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २१ : वाशीतर्फे देवरूख शाळेत शिव्यामुक्त शाळा हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिव्या न देण्याची शपथ घेतली. साडवली येथील चक्रभेदी सोशल फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे जिल्ह्यात शिव्यामुक्त समाज अभियान राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिव्यामुक्ततेचे महत्व पटवून देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. संस्थेच्या संथापिका वैदेही सावंत यांनी शिव्यायुक्त भाषेमुळे मनांवर होणारे असंस्कार, त्यामुळे समाजात होणारी भांडणे, समाजात तयार होणारी असभ्य प्रतिमा या विषयी त्यांनी प्रबोधन केले. आई -बहिणींवरून वापरले जाणारे अपशब्द हे नात्यांमध्येही नकळत तेढ निर्माण करत असल्याचेही सावंत यांनी सांगितले. अशी शपथ घेणारी संगमेश्वर तालुक्यातील ही पहिली शाळा ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.