नेमबाजी स्पर्धेत साहिश तळणकरचे यश

नेमबाजी स्पर्धेत साहिश तळणकरचे यश
Published on

58898
साहिश तळणकर

नेमबाजी स्पर्धेत साहिश तळणकरचे यश
आरोंदा ः वेंगुर्ले येथे झालेल्या मुंबई विद्यापीठ कोकण झोन अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन शूटिंग स्पर्धेत एस.पी.के. महाविद्यालय, सावंतवाडीच्या साहिश तळणकर याने उल्लेखनीय कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली. बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या आयोजनाखाली वेंगुर्ले कॅम्प येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत साहिश याने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण तर १० मीटर पीपसाईट प्रकारात रौप्यपदक पटकावले. यापूर्वीही एनसीसीमार्फत त्रिची तामिळनाडू येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ५० मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंग स्पर्धेतही त्याने रौप्यपदक प्राप्त केले होते. साहिशला उपरकर शूटिंग अकॅडमीचे कांचन उपरकर, कोल्हापूरचे इंद्रजित मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. या दुहेरी यशाबद्दल एस.पी.के. महाविद्यालयाचे प्रा. भारमल, क्रीडा शिक्षक सी. एन. नाईक तसेच शिक्षकवृंदाने त्याचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com