अहिल्यादेवी ट्रस्टतर्फे शालेय साहित्य

अहिल्यादेवी ट्रस्टतर्फे शालेय साहित्य
Published on

58955

अहिल्यादेवी ट्रस्टतर्फे शालेय साहित्य
तळेरे : अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी, गुरुववाडी, केदारलिंगवाडी व बौद्धवाडी या दुर्गम भागांतील १०७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी योगिराज गायकवाड सरकार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व सॅनिटरी पॅड वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. प्रवीण काकडे यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. कराड तालुक्यातील धोंडेवाडी प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील ७० मुलांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच सांगली जिल्ह्यातील पलूस येथील एस.पी. अकॅडमीच्या ३७ विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, मुख्याध्यापक रोशन मुडे, सरपंच प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, विकास पाटील, शालन पाटील, प्रदीप घाडगे, पांडुरंग गावडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com