वाळूचा डंपर घरसल्याने असलदेत वाहतूक कोंडी

वाळूचा डंपर घरसल्याने 
असलदेत वाहतूक कोंडी
Published on

58959

वाळूचा डंपर घरसल्याने
असलदेत वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २२ ः देवगड-निपाणी राज्य मार्गावर असलदे उगवतीवाडी येथे माल वाहतूक करणारा डंपर बाजूपट्टीवरून घसरला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. डंपर बाहेर काढताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. यामुळे रेल्वे प्रवाशांची धांदल उडाली. हा अपघात शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी झाला. उगवतीवाडी येथील वळणावर समोरून येणाऱ्या एसटी बसला बाजू देताना बाजूपट्टीचा अंदाज न आल्याने वाळूने भरलेला डंपर घसरला. जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या अपघातामुळे रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com