अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्ती 31 पर्यंत द्या

अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्ती 31 पर्यंत द्या
Published on

अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्ती ३१ पर्यंत द्या
शिक्षण संचालनालय : दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वारसाना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन पावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यात आले असून, येत्या ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे कडक निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
सुधारित धोरणानुसार, अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या वारसदारांनी शासन निर्णयासोबत जोडलेल्या ''परिशिष्ट-क'' मधील विहित नमुन्यातच सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक केले आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनी काटेकोरपणे छाननी करावी, तसेच हे सर्व परिपूर्ण प्रस्ताव वेळेत शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून केले आहे. प्रस्तावांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिल्यास किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे कार्यवाहीस विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्थाचालक व मुख्याध्यापकांची राहील, असा स्पष्ट इशाराही दिला आहे.
शाळांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची अंतिम पडताळणी संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत केली जाणार आहे. शासन नियमांनुसार पूर्णपणे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना ठरवून दिलेल्या मुदतीत नियुक्ती देण्याची अंतिम जबाबदारी या विभागावर सोपवली आहे. अनुकंपा तत्त्वावरील ही नियुक्ती दुःखात असलेल्या आणि गरजू कुटुंबांच्या उपजीविकेसाठी अत्यंत आधारवड ठरणारी आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक आणि पात्र उमेदवारांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून ही सर्व प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com