

59183
लाचेसंबधीची टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा
अविनाश पाटीलः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा आहे. लाच कोणी मागत असेल किंवा देत असेल तर अशा दोघांवरही कारवाई करण्यासाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सुजाण नागरिक म्हणून लाचेसंबधीची तक्रार टोल फ्री क्रमांकावर करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.
शासकीय नोकरांनी लाचेची मागणी, लाच स्वीकारणे,शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा प्राप्त करणे व पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार करणे, शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या नावे किंवा त्याच्यावतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देवू शकणार नाही, अशा आर्थिक साधन-संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवणे. अशा गुन्ह्याचा तपास एसीबीमार्फत होतो. लोकसेवक किंवा खासगी व्यक्ती जो लोकसेवकाच्यावतीने लाचेची मागणी करेल व स्वीकारेल. ज्या लोकसेवकाकडे तक्रारदाराचे कायदेशीर काम प्रलंबित आहे अशा लोकसेवकाविरुध्द तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरूपयोग करणाऱ्या लोकसेवकाविरूध्द तक्रार देता येते.
तक्रारदाराची ओळख तसेच लाचेचा सापळा ही गुप्त ठेवली जाते. सापळा कारवाईनंतर आरोपी लोकसेकवकाकडून तक्रारदारास धमकी प्राप्त झाल्यास एसीबीमार्फत आरोपीविरूध्द पुरावे जमा करून त्याचा जामिन रद्द होण्याकरिता न्यायालयास विनंती केली जाते. सापळा कारवाईनंतर तक्रारदाराचे प्रलंबित काम एसीबीमार्फत पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला जातो, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
चौकट
येथे करा तक्रार
तक्रार १०६४ या टोल फ्री क्रमांकाद्वारे www.acbmaharashtra.gov.in Anti-Corruption Bureau Maharashtra या फेसबुक पेजवरील lodge व कंप्लेंट सदराखाली करता येते. लाचेची तक्रार देण्याकरिता तक्रारदाराने स्वत: एसीबी कार्यालयात हजर राहणे गरजेचे असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.