लांजात श्रावण मास पंढरपूर वारी उत्साहात

लांजात श्रावण मास पंढरपूर वारी उत्साहात
Published on

लांज्यात श्रावण मास
पंढरपूर वारी उत्साहात
अकराव्या वर्षी आयोजन ; धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २३ ः तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित विशेष श्रावण मास पंढरपूर वारी उत्साहात पार पडली. सलग अकराव्या वर्षी आयोजित या वारीत सहभागी होत शेकडो भाविकांनी धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचा भक्तिमय आनंद लुटला.
पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी प्रत्येक वारकरी नेहमीच आतुर असतो. हीच परंपरा जपत लांजा तालुका वारकऱ्यांच्या वतीने गेली दहा वर्षे श्रावण मासात विशेष पंढरपूर वारीचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे या वारीचे ११ वे वर्ष होते. १८ ते २० ऑगस्ट दरम्यान झालेल्या या सोहळ्यात काकड आरती, विष्णूसहस्रनाम स्तोत्र, तुळशी अर्चन, कीर्तन, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ, अध्यात्मिक शंका-निरसन, चर्चासत्र आणि काल्याचे कीर्तन यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. या वारीत लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर यांसारख्या स्थानिक भागांसह ठाणे, मुंबई व पेन येथील सुमारे ७५ वारकरी-भाविकांनी सहभाग घेतला होता. लांजा तालुक्यातील गवाणे, पुनस, मठ, आसगे, लांजा, इंदवटी, कोंडये, वनगुले, वाकेड, कुडेवाडी, व्हेळ, आरगाव, आणि वेरवली या गावांतील भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
हा सोहळा सुभाष पवार (मठ), प्रकाश रामाणे (व्हेळ) आणि ज्येष्ठ वारकरी रमेश घुमे (गवाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चंद्रकांत महाराज पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली व अध्यात्मिक मार्गदर्शनाखाली पार पडला. सोहळ्यात पहिले कीर्तन मधुकर महाराज शेट्ये (ठाणे) यांचे, तर दुसरे आणि काल्याचे कीर्तन पवार महाराज (वेरवली) यांचे झाले. हरिपाठाचे नेतृत्व सूर्यकांत माने महाराज (मुंबई) यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com