गणेशोत्सवाचे बांद्यात नियोजन

गणेशोत्सवाचे बांद्यात नियोजन
Published on

59070

गणेशोत्सवाचे बांद्यात नियोजन

पोलिसांची बैठक; एकदिशा मार्गासह कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ : आगामी गणेशोत्सव, गोपाळकाला व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत व उत्साहात पार पडावेत, यासाठी येथील पोलिस ठाण्यात आज सकाळी नियोजन बैठक झाली. सावंतवाडीचे नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, एकदिशा मार्गाची अंमलबजावणी तसेच उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बांदा ग्रामपंचायत प्रशासन, शांतता समिती, मोहल्ला समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहीहंडी मंडळे, व्यापारी व ग्रामस्थांच्या सहभागातून सकाळी ११ वाजता ही बैठक झाली. गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चौकाचौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती, आवश्यक ठिकाणी बॅरिकेड लावणे, नो-पार्किंग झोन निश्चित करणे तसेच पे-अँड-पार्कच्या जागा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. माटवी बाजार दोन दिवस अगोदर भरत असल्याने त्या काळात वाढणारी वाहतूक व नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यावरही चर्चा झाली. पार्किंगसाठी खेमराज हायस्कूलचे मैदान उपलब्ध करून घेण्याबाबत तसेच बांदा उड्डाणपुलाखालील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवर एकदिशा वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याबाबत पोलिस प्रशासनाने सूचना दिल्या.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भाऊ वाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, आबा धारगळकर, अरुणा सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदेश पावसकर, आसिफ शेख, प्रसाद वाळके, शैलेश केसरकर, उदय येडवे, सर्वेश गोवेकर, रियाज खान, नीलेश कदम, विठ्ठल वाळके, लकरकोट दत्तमंदिर समिती अध्यक्ष सुशांत पांगम, जुबेर शेख, मंगलदास साळगावकर, अस्लम खतीब, शहीद शेख, सुनील माजगावकर, सचिन वीर, साहिल खान, दिलवान शेख, कुतूबुद्दीन शेख, आपा कोचरेकर, निखिल मयेकर, जहूर शेख आदी उपस्थित होते. बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-------------------
सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे
उत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी व्यापारी, ग्रामस्थ आणि उत्सव मंडळांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनी केले. उत्सव कालावधीत शहरात आजूबाजूच्या ३० ते ४० गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. यामध्ये गोवा राज्यातील ग्राहकांचा मोठया संख्येने समावेश असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com