ओबीसी योजनांबाबत मदत करू

ओबीसी योजनांबाबत मदत करू
Published on

59077

ओबीसी योजनांबाबत मदत करू

उदयसिंह गायकवाड : तालुकानिहाय शिबिरे घेण्याचा मानस

ओरोस, ता. २३ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ओबीसी समाजातील शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी भविष्यात जिल्ह्यात तालुकानिहाय माहिती शिबिरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी दिली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सिंधुदुर्ग कार्यालयात ओबीसी व आरक्षित महासंघ सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने विविध प्रवर्गांसाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी योजनांविषयी माहिती शिबिर आयोजित केले होते. यावेळी ओबीसी व आरक्षित महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा समता परिषदेचे समन्वयक हेमंत ऊर्फ काका कुडाळकर, ओबीसी महासंघाचे राज्य समन्वयक सुनील भोगटे, सहाय्यक संचालक गायकवाड, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी स्वप्निल कांबळे आदी उपस्थित होते. शिबिरात शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण, वसतिगृह, आधार योजना, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच विविध महामंडळांच्या कर्ज योजनांसह विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
काका कुडाळकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक असताना केवळ साडेसात हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत. ही तफावत कमी करण्यासाठी शालेय स्तरापासून योजनांची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणासाठी वसतिगृहाचा लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आधार योजनेचा लाभ घ्यावा. परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठीही शासनाकडून मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी या संधींचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा.’’
यावेळी वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक गणेश हुकीरे, शामराव पेजे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वर्षा कासले, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे सूरज बागवे आदींनी योजनांची सविस्तर माहिती दिली.
बाळा कन्याळकर, सुनील पाटकर, संदीप चव्हाण, सुहास मोचेमणकर, तुकाराम तेली, साईनाथ आंबेडकर, लक्ष्मण तेली, अमिदी मेस्त्री उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com