शिष्यवृत्ती परीक्षेत गायत्री केणीचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत गायत्री केणीचे यश
Published on

59079

शिष्यवृत्ती परीक्षेत गायत्री केणीचे यश
ओरोस : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये जीवन शिक्षण विद्यामंदिर, कोळंबची विद्यार्थिनी गायत्री अभिजित केणी हिने उल्लेखनीय यश मिळविले. तिने मालवण तालुक्यात आठवा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७६ वा क्रमांक पटकावला. गायत्रीने मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या यशामुळे जीवन शिक्षण विद्यामंदिर, कोळंबच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिला शाळेच्या मुख्याध्यापिका मधुचंदा वस्त, शिक्षक अनिता रोड्रीग्ज व काजल बोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com