

59118
तळेरेतून जवानांना ‘कृतज्ञतेची राखी’
तळेरे : रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तसेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील विद्यार्थ्यांनी ‘कृतज्ञतेची एक राखी सीमेवरच्या जवानांसाठी’ हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या तयार करून सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना पाठविल्या. देशाच्या सुरक्षेसाठी कुटुंबापासून दूर राहून सण-उत्सवांचा त्याग करणाऱ्या जवानांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या उपक्रमासाठी तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, विद्यालयाचे अध्यक्ष अरविंद महाडिक, सर्व शाळा समिती सदस्य, प्रा. अविनाश मांजरेकर, प्रा. सचिन शेटये, प्रा. अन्वी गवाणकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.