जलस्त्रोतांचे जतन काळाची गरज

जलस्त्रोतांचे जतन काळाची गरज
Published on

59163

जलस्त्रोतांचे जतन काळाची गरज

अमोल लोके ः कुणकेश्वर केंद्रशाळेत जलसंधारण दिन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः जलसंधारण ही काळाची गरज असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येकाने पाण्याचे संवर्धन व उपलब्ध जलस्त्रोतांचे जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपसभापती अमोल लोके यांनी कुणकेश्‍वर येथे व्यक्त केले.
कुणकेश्‍वर केंद्रशाळेत आयोजित जलसंधारण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी नीलेश जगताप, विस्तार अधिकारी तुषार हळदणकर, महेश ताम्हणकर, शशिकांत लब्दे, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, केंद्रप्रमुख देवकी फाळके, मुख्याध्यापक तात्या लवटे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. जगताप यांनी, विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन आणि उपलब्ध जलस्त्रोतांचे जतन याबाबत मार्गदर्शन केले. महेश ताम्हणकर यांनी, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपशिक्षिका पल्लवी ढेरे यांनी, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जलसंधारणबाबत कामगिरीची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण कामाबाबत मनोगत व्यक्त केले. यानंतर जलस्त्रोतांचे संरक्षण व पाणी बचतीबाबत उपस्थितांनी जलसंधारणाची शपथ घेतली. विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये पाणी बचत, जलस्त्रोतांचे संरक्षण आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास पाणी व स्वच्छता गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ हर्षदा बोथीकर, पदवीधर शिक्षिका अमृता पाटील, उपशिक्षिका पल्लवी ढेरे, बचतगट प्रतिनिधी दीपा साईम तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक करून सूत्रसंचालन तात्या लवटे यांनी केले. आभार अमृता पाटील यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com