''कोमसाप''च्या श्रावण काव्यसंमेलनात शब्दांची बरसात

''कोमसाप''च्या श्रावण काव्यसंमेलनात शब्दांची बरसात
Published on

rat23p20.jpg-
59176
रत्नागिरी ः पटवर्धन प्रशालेत झालेल्या ''कोमसाप''च्या श्रावण काव्यसंमेलनात कविता सादर करताना कवी.
----------
कोमसाप रत्नागिरी शाखा
श्रावण काव्यसंमेलन
रसिक मंत्रमुग्ध ; विविध कवींनी सादर केल्या कविता
रत्नागिरी, ता. २३ ः क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, या निसर्गाच्या लहरी खेळाप्रमाणेच मनाला भावणाऱ्या रचनांनी कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) रत्नागिरी शाखेच्या श्रावण काव्यसंमेलनात एक वेगळीच रंगत आली होती.
पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या देखण्या सोहळ्यात पावसाच्या सरी आणि बहारदार कवितांच्या संगमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कोमसाप रत्नागिरीचे अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी प्रास्ताविकातून मराठी साहित्याची परंपरा आणि कोकणातील कवींच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडली. या काव्यसंमेलनात बाल कवींपासून ते तरुण आणि अनुभवी कवींपर्यंत सर्वांनीच श्रावणाचे रूप, निसर्ग सौंदर्य आणि मानवी भावनांवर आधारित कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. मानसी मराठे, अपर्णा गोगटे, गुरुदेव नांदगावकर, ईशिका हरचकर, सेजल मेस्त्री, अनुया बाम, वृषाली टाकळे, मालवी होरंबे, स्मिता साळवी, श्रावणी धनावडे, विश्वनाथ गावडे, अथर्व केळुसकर, डॉ. प्रणाली दहिहंडे, साक्षी शितप, श्रावणी शिंदे, तन्वी पटवर्धन, श्रुती फुटक, वसुंधरा जाधव आणि विनायक हातखंबकर या प्रतिभावान कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
या वेळी साहित्यिक डॉ. चित्रा गोस्वामी, प्रसिद्ध चारोळीकार कवी प्रकाश सावंत, प्राचार्या लता पाटील, वसुंधरा जाधव, वैजयंती पाटील आणि कोमसाप युवाशक्ती प्रमुख गुरुदेव नांदगावकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com