

- rat२४p४.jpg-
26O59308
खेड ः सरोदे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या ‘समाज पतपेढी’ शाखेचे उद्घाटन करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम, दादा इदाते व मान्यवर
---
कोकणातील सहकार क्षेत्र स्वच्छ
योगेश कदम ः सरोदे पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २४ : ‘लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सहकार क्षेत्र अधिक व्यापक आणि भक्कम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. कोकणातील सहकार क्षेत्र किती स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने कार्यरत आहे. मागील दीड वर्षात कोकणातील आर्थिक घोटाळा अथवा गैरव्यवहाराची एकही फाईल माझ्याकडे आलेली नाही. ही बाब संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद आहे,’ असे गौरवोद्गार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काढले.
सरोदे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित (टेटवली) यांच्या खेड येथील तिसऱ्या ‘समाज पतपेढी’ शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात हा सोहळा उत्साहात पार पडला. मंत्री कदम म्हणाले, कोकणातील सहकार क्षेत्राचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिक असून, येथील सहकारी पतसंस्थांकडून होत असलेली १०० टक्के कर्जवसुली ही कोकणच्या आर्थिक शिस्तीचे आणि विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. गेल्या १९ वर्षांत कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल करत सरोदे पतसंस्थेने जनसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार संजय कदम, नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपसभापती सुनील मोरे यांच्यासह पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.