...तर शिक्षकांना अशैक्षणिक कामांतूनही मुक्त करा

...तर शिक्षकांना अशैक्षणिक कामांतूनही मुक्त करा
Published on

शिक्षकांवरील अशैक्षणिक भार हटवा
पुरोगामी शिक्षक संघटना ः जिल्हा परिषदेला पत्र
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः शाळेच्या वेळेत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जाणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने घेतला आहे. या निर्णयाचे पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते प्रदीप पवार यांनी स्वागत केले; मात्र, केवळ आदेश न काढता प्रशासनाने शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करून निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पवार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या पत्राद्वारे विविध मुद्दे मांडले आहेत. अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडूनच विविध कामांसाठी शिक्षकांना अनधिकृतपणे कार्यालयात बोलावले जाते. त्यामुळे कारवाई करताना बोलावणाऱ्या यंत्रणेवरही जबाबदारी निश्चित व्हावी.
शाळेत मोबाईल वापरण्यास मनाई असली तरी प्रशासनाकडूनच ऑनलाईन प्रशिक्षणे आणि विविध लिंक भरण्यासाठी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरावा लागतो. यामुळे अध्यापनावर परिणाम होतो. कर्मचाऱ्यांनी थेट शिक्षकांना फोन करून माहिती मागवण्याऐवजी विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांमार्फतच माहितीची देवाणघेवाण व्हावी. बँक, ग्रामसभा, आरोग्य केंद्र व विशेषतः बीएलओच्या (निवडणूक) कामांमुळे दोन ते तीन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये मोठा खोळंबा होतो, याकडेही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. शिक्षकांना बीएलओसारख्या कामांतून मुक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा आणि या कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमल्यास बेरोजगारीही कमी होईल, असे त्या पत्रात नमूद केले आहे.
----
शिक्षणाचा दर्जा उंचावेल
शिक्षकांना शाळेत अधिक वेळ देण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय सकारात्मक असून, त्याचे स्वागत आहे; मात्र शिक्षकांना शाळेबाहेरील अनावश्यक कामांतून प्रत्यक्षात मुक्त करून शैक्षणिक कामाला प्राधान्य दिल्यासच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे पवार यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com