''डॉक्टर्स टास्क फोर्स''ची स्थापना

''डॉक्टर्स टास्क फोर्स''ची स्थापना
Published on

दापोलीत ‘डॉक्टर्स टास्क फोर्स’
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार; आरोग्यसेवा सुरक्षिततेवर भर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २४ ः दापोली तालुका व परिसरातील आरोग्यसेवा अधिक सुरक्षित, सुसंवादी आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने दापोलीतील वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्र येत ‘डॉक्टर्स टास्क फोर्स दापोली तालुका’ ची स्थापना केली आहे. रुग्णालये व क्लिनिकमध्ये काम करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेकदा तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी वाद न चिघळवता संवादातून प्रश्न सोडवणे आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे, हा या टास्क फोर्सचा मुख्य उद्देश आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टास्क फोर्सची पहिली बैठक नुकतीच दापोलीत पार पडली. डॉक्टर, परिचारिका व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील गैरसमज दूर करून समन्वय साधण्यावर भर दिला आहे. तणावपूर्ण किंवा अनुचित घटना घडल्यास मार्गदर्शन करणे आणि आवश्यकतेनुसार पोलिस व प्रशासनाची मदत घेणे, दापोलीतील सर्व वैद्यकीय उपचारांच्या पद्धती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणे असे निर्णय या वेळी घेण्यात आले.
ही टास्क फोर्स केवळ डॉक्टरांपुरती मर्यादित नसून यात सर्व उपचारपद्धती करणाऱ्या अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी तसेच परिचारिका, लॅब व एक्स-रे किंवा सीटी स्कॅन तंत्रज्ञ आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठीही काम करणार आहे. या स्थापनेत डॉ. कौस्तुभ रानडे, डॉ. संजय बागडे, डॉ. संदेश लखमदे, डॉ. नरेश पटवर्धन, डॉ. कुणाल मेहता, डॉ. सुयोग भागवत, डॉ. विद्या दिवाण, डॉ. विनोद जोशी, डॉ. शिरीष फाटक, डॉ. अनिरुद्ध डोंगरे, डॉ. प्रसाद करमरकर, डॉ. शबनम मुकादम व डॉ. काझीम खोत या १३ डॉक्टरांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे.
---
अडचणी समजून संवाद साधणार
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी समजून घेऊन योग्य संवाद साधणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा समतोल राखत सुरक्षित, दर्जेदार व विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com