

- rat२४p१३.jpg-
26O59318
गुहागर ः भंडारी भवनाच्या पटांगणात घातलेले रिंगण.
---
भजनाच्या सुरांनी रंगला श्रावण
हितवर्धक मंडळाचा उपक्रम; महोत्सवाला प्रतिसाद
गुहागरमध्ये रंगला श्रावण भजन महोत्सव
हितवर्धक मंडळाचा उपक्रम; भैरवीच्या सुरांनी सांगता
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २४ ः अखिल भजन सम्प्रदाय हितवर्धक मंडळ (महाराष्ट्र) गुहागर तालुक्याच्यावतीने आयोजित ‘श्रावण भजन महोत्सव’ हा कार्यक्रम कीर्तनवाडी रोड येथील भंडारी भवन येथे मोठ्या उत्साहात झाला. सकाळी भंडारी भवनाच्या पटांगणात भव्य रिंगण सोहळा उत्साहात झाला.
गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे, नगराध्यक्ष नीता मालप, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, नगरसेवक अमरदीप परचुरे, अमोल गोयथळे, सुजित साटले, श्रीया मोरे, अखिल भजन सम्प्रदाय हितवर्धक मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष बुवा भगवान लोकरे, सचिव बुवा प्रमोद हर्याण, बुवा श्रीधर मुणगेकर आणि तालुकाध्यक्ष सागर मोरे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी भजनातील योगदानाबद्दल भजनसम्राट बुवा भगवान लोकरे, बुवा श्रीधर मुणगेकर व बुवा प्रमोद हर्याण यांना सभापती व उपसभापतींच्या हस्ते गौरवण्यात आले. ‘काळ बदलला तरी तालुक्यातील तरुणांनी ही भजन परंपरा उत्तम प्रकारे जपली आहे,’ अशा शब्दांत पोळेकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच भजनातील ‘भुंकणारे भुंकू दे... आम्ही भजनात दंग’ या प्रसिद्ध अभंगाचा संदर्भ देत राजकारणातील टीकेकडे दुर्लक्ष करून सामाजिक कामात व्यस्त राहण्याचा संदेश त्यांनी दिला. दिवसभरात तालुक्यातील विविध भजन मंडळांनी बहारदार भजन सादर केली. सायंकाळी भजनसम्राट बुवा भगवान लोकरे, बुवा श्रीधर मुणगेकर व बुवा प्रमोद हर्याण या ‘त्रिमूर्तीं’चा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर भैरवीच्या सुरांनी महोत्सवाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.