

59324
न्हावेली मार्गावर खड्ड्यांमुळे
वाहनधारक, पादचारी त्रस्त
पाणी साचत असल्याने अपघाताची भीती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ : निरवडे-न्हावेली-दांडेली-कोंडूरा-तळवणे-आरोंदा या प्रमुख मार्गावरील न्हावेली विवरवाडी येथे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचत आहे. याचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दांडेली, कोंडूरा व तळवणे परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्यालगतची झाडीही वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
या समस्यांबाबत न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता पूजा इंगवले मॅडम तसेच उपअभियंता पाटील यांच्याशी चर्चा करून गणेशोत्सवापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची मागणी केली. सदर मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठविण्यात आले. पाहणीदरम्यान रस्त्यावरील खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे तसेच वाढलेली झाडी यांची तपासणी करण्यात आली. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यावर तात्काळ उपाययोजना करणे, खड्डे बुजविणे आणि रस्त्यालगतची झाडी काढून टाकणे अशा सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या. यावेळी न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर, अक्षय नाईक, राज धवण, रुपेश मोरजकर, कुलदीप नार्वेकर आणि प्रज्योत मालवणकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.