

59332
निरुखेच्या विकासाचे
ध्येय ः दत्ता सामंत
शिवसेनेतर्फे एनसीएमसी कार्ड वाटप
कुडाळ, ता. २५ ः निरुखे पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय आहे. एनसीएमसी मोफत कार्ड वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निरुखे येथे केले. निरुखे गावातील २०० ग्रामस्थांना शिवसेनेमार्फत मोफत एनसीएमसी कार्ड वाटप करण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने आमदार नीलेश राणे यांच्या सौजन्याने एस.टी. बस सवलतीचे एनसीएमसी कार्ड वाटप निरुखे ग्रामपंचायत येथे जिल्हाप्रमुख सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. २३) पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, सरपंच कीर्तिकुमार तेर्से, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक आदी उपस्थित होते. श्री. साईल म्हणाले, ‘‘कुडाळ मालवण मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आमदार राणे अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यांनी गेल्या दीड वर्षांपासून कुडाळ आणि मालवणमध्ये २५ एसटी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. एसटीचे सवलत कार्ड सर्वांसाठी वरदान ठरणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.