बाल वैज्ञानिकांनी अनुभवला चंद्रयान शो

बाल वैज्ञानिकांनी अनुभवला चंद्रयान शो
Published on

-rat२४p२.jpg-
26O59303
रत्नागिरी : खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुप आणि आनंदालय होम स्कूलतर्फे आयोजित राष्ट्रीय अवकाश दिन कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी प्रात्यक्षिक करताना.
-rat२४p३.jpg-
26O59304
रत्नागिरी : श्रीमान हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक.
----

बालवैज्ञानिकांनी अनुभवले अंतराळ
राष्ट्रीय अवकाश दिन; कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : राष्ट्रीय अवकाश दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील बालवैज्ञानिकांनी थेट अवकाशाची रंजक सफर अनुभवली. ‘खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुप’ आणि ‘आनंदालय एक्सपेरिअन्शियल होम स्कूल’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी माळनाका येथील श्रीमान हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी चांद्रयान शो अतिशय उत्साहाने पाहिला पाहिला.
केवळ नेहमीची व्याख्याने किंवा सादरीकरण न ठेवता विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करून विज्ञान अनुभवावे, या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला. इन्फोविजन संस्थेतर्फे ‘चांद्रयान-३’ वर आधारित ३६०-डिग्री (फुल डोम) शो दाखवण्यात आला. उत्कृष्ट ध्वनिव्यवस्था आणि मराठीतील सोप्या भाषेमुळे मुलांनी या शोचा मनमुराद आनंद घेतला व चंद्रमोहिमेची संपूर्ण माहिती समजून घेतली.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. नीशा केळकर यांनी विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ या संस्थेचे कार्य, अंतराळ मोहिमा आणि खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही अत्यंत उत्साहाने आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले.
मुलांनी सूर्यमालेची अचूक माहिती देणारी २D कागदी प्रतिकृती स्वतः तयार केली. यासोबतच पृथ्वी आणि चंद्र यांचे एकमेकांशी असलेले आकारमान व अंतर दर्शवणारी प्रतिकृतीही बनवली. हे सर्व साहित्य मुलांनी ‘स्टडी किट’ म्हणून आनंदाने घरी नेले.
रत्नागिरीतील माध्यमिक शाळांमधील ४०हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी भेट देऊन या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ अभ्यासक सुहास गुर्जर, योगेश पेडणेकर, प्रा. बाबासाहेब सुतार व उपेंद्र बापट यांनी मुलांना सौरमालेचा आवाका सोप्या भाषेत समजावून सांगितला. स्नेहल मेस्त्री यांनी प्रात्यक्षिक सत्र घेतले. या कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या खगोलशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली.
---
‘सकाळ’च्या अंकाचे वितरण
‘सकाळ’मध्ये प्रा. बाबासाहेब सुतार यांचे खगोलविषयक साप्ताहिक सदर सुरू आहे. या कार्यशाळेच्या निमित्ताने प्रा. सुतार यांनी लिहिलेल्या सदराचे वाचन करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना ‘सकाळ’चे वितरण करण्यात आले.
---
कोट
पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीतून साजरा झालेला हा राष्ट्रीय अवकाश दिन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची नवी आवड निर्माण करणारा ठरला. रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या तारांगण व त्यातून खगोल अभ्यासाला गती देण्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येतील.
-प्रा. बाबासाहेब सुतार, आयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com