आंबेकर प्रथम

आंबेकर प्रथम
Published on

‘माय क्लिक फोटोग्राफी’त आंबेकर प्रथम
रत्नागिरी, ता. २४ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ‘माय क्लिक’ फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आराध्य आंबेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. महाविद्यालयातील अकरावी व बारावीच्या वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोबाईलवर क्लिक केलेले विविध फोटो या स्पर्धेत पाहायला मिळाले. या स्पर्धेचे परीक्षण छायाचित्रकार अमेय दत्ते यांनी केले. स्पर्धेत अकरावी वाणिज्यचा आराध्य आंबेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. बारावी विज्ञानची सुमुखी केळकर हिने द्वितीय, तर अकरावी विज्ञानचा वेदांग नाचणकर याने तृतीय क्रमांक मिळवला. या विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.


मार्तंड झोरेला नेमबाजीत सुवर्णपदक
रत्नागिरी, ता. २४ : मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-४ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला नेमबाजी स्पर्धेमध्ये श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मार्तंड झोरे याने ओपन साइट एअर रायफल या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. ही स्पर्धा वेंगुर्ला येथील कांचन उपकर शूटिंग रेंज, कॅम्प मैदान येथे आयोजित करण्यात आली होती. मार्तंडच्या या यशाबद्दल श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आशिष बर्वे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.


गोडबोले विद्यामंदिरात जलसंधारण सप्ताह
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या केळ्ये गावातील श्री. शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यालयात जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यालयांमध्ये जलसंवर्धन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाची व मृदा संधारणाची प्रतिज्ञा म्हटली. शिक्षिका श्रुती रहाटे यांनी विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाची व मृदा संधारणाची आवश्यकता स्पष्ट करणारे मार्गदर्शन केले. शिक्षिका अनघा रसाळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com